बदनाम आँस्ट्रेलिया

आँस्ट्रेलियन क्रिकेट मागच्या दाेन तीन दिवसापासुन खुप बदनाम झाला आहे.खरे तर हि वागणुक त्यांची आजची नाहीच.फार पुर्वीपासुन आँस्ट्रेलिया क्रिकेट मध्ये वाईट गाेष्टी आणुन क्रिकेटची बदनामी करत आहे.याची बरीच उदाहरणे आहेत.1)मुरलीधरन जेव्हा बाँलींग करत हाेता तेव्हा पंचांनी त्याला सलग नाे बाँल दिले.2)क्रिकेटमध्ये स्लेजिंग यांनीच आणले जेव्हा समाेरचा संघ वरचढ व्हायला तर त्यांना शिव्या घालायच्या.आपल्या भारतीय संघातील खेळाडुंना यांनी कितीतरी शिव्या घातल्या.नशिब चांगले गांगुली नावाच्या माणसाने भारतीय संघाला प्रत्युत्तर द्यायला शिकवले.3)सिडनी कसाेटीत सायमंडच्या बँटला चेंडु लागुन गेला पण पंचांनी त्याला नाबाद ठरवले पुढे यानेच शतक ठाेकुन भारताला हरवले.4)पाँटींगने कँच पकडल्यानंतर पंचांना एकदालआदेश दिला हाेता की आऊट द्या.तेव्हा पंचांनी आऊट दिले.अशा अनेक उदाहणातुन सिद्ध हाेते की आस्ट्रेलियाने सभ्य लाेकांचा खेळ बदनाम केला.त्यामुळे त्यांना शिक्षा ही व्हायलाच पाहिजे.

टिप्पण्या