लायकी

जर सरकारने सार्वजनिक ठिकाणी एखादी साेय केलेली असेल तर लाेक तिची पार वाट लावुन टाकतात.पाणपाेईचे नळ ताेडणे,शाळेच्या भिंतीवर काेळशाने लिहणे,बसचे शिट फाडणे असे अनेक उद्याेग भारतीय लाेक करतात.याचे कारण जर त्यांना विचारले तर सांगतात की सहज केले म्हणुन असे सांगतात.विदेशात असे चित्र दिसत नाही.विदेशात लाेक रस्त्यावर थुंकत नाही.राेडवर नेहमी नियमानुसार गाडी चालवतात विशेष म्हणजे हे सांगायला पाेलीस लागत नाही.सगळ्या गाेष्टी आपाेआप घडतात.याचे कारण म्हणजे त्यांना असणारी देशाविषयी आपुलकी.आपल्या लाेकांमध्ये आपुलकी नाही असे नाही पण ती अशा गाेष्टींमध्ये दिसत का नाही.जर एखादा क्रिकेटपटु लाेकप्रिय झाला तर लाेक त्याच्यी जात काय आहे हे नेटवर सर्च करतात.बाहेर दाखवण्यापुरती आधुनिकता बाळगतात पण घरी आल्यावर पुन्हा परंपरागत द्रष्टीकाेन..जर एखाद्या व्यक्तीने बाेलतांना उदाहरणात सावरकर किंवा बुद्धांचे उदादरण दिले तर ऐकणारे परस्पर त्याची जात ठरवुन माेकळे हाेतात.व म्हणतात ताे असेच बाेलणार.याचे कारणांचा मी माझ्या पद्धतीने शाेध घेण्याचा प्रयत्न केला तर मला खालील निष्कर्ष दिसुन आले.               1)आपण भारतीय परंपरा महान म्हणताे पण त्यामध्ये काळानुसार बदल केला तरच ती महान राहते.आपण त्यालाच चिकटुन राहिल्यामुळे मानसिकतेत बदल झाला नाही.म्हणुन ही परंपरा नष्ट झाली.                    2)हि वस्तु माझी नाही सार्वजनिक आहे आपल्याला काय करायचे आहे हा विचार आपण करताे.             3)जर कुणी समजवण्याचा प्रयत्न केला तर आपण त्याचे ऐकत नाही.                                                   या सर्व निष्कषावरुन हे दिसुन येते की आपण अजुन सार्वजनिक वस्तुंचा वापर करण्यासाठी परीपक्व नाही.या गाेष्टीला किती वेळ लागेल हे पाहणे महत्वाते आहे.धन्यवाद.

टिप्पण्या